You are currently viewing Jawed Habib Tips For Frizzy Hair : जावेद हबीबने दिल्या पक्ष्यांच्या घरट्यासारखे केस असणा-या लोकांना खास टिप्स, एका वॉशमध्येच केस बनतात सिल्की व स्मूद, लोकांनी मानले आभार!
star-hairstylist-jawed-habib-reveals-why-the-slowdown-doesnt-hurt-his-30-million-biz

Jawed Habib Tips For Frizzy Hair : जावेद हबीबने दिल्या पक्ष्यांच्या घरट्यासारखे केस असणा-या लोकांना खास टिप्स, एका वॉशमध्येच केस बनतात सिल्की व स्मूद, लोकांनी मानले आभार!

रूखे-सुखे अर्थात कोरडे किंवा ड्राय केस जेव्हा एकमेकांमध्ये गुंतवतात तेव्हा ते चिमणीच्या घरट्यासारखे दिसू लागतात. हे कसे घरबसल्या तुम्ही कसे स्मूद व सिल्की बनवू शकता हे सांगण्यासाठी जगप्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी एक साधासोपा घरगुती उपाय सांगितला आहे. (Jawed Habib Hair Care Tips For Frizzy Hair)
अनेक स्त्रियांना रूक्ष केसांची समस्या सतावते आणि त्यांचे केस एकमेकांत अडकल्याने त्यांना अधिकच त्रास होतो. शिवाय केस सतत तुटतात ते वेगळेच! यावर रामबाण उपायाच्या शोधात अशा स्त्रिया नेहमीच असतात. पण प्रत्येक उपाय कमी येईलच असे नाही. जर तुम्ही सुद्धा अशा समस्येला तोंड देत असाल आणि त्यावर रामबाण उपाय शोधत असाल तर तो रामबाण उपाय तुमच्यासाठी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत. हा उपाय खुद्द हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (jawed habib) यांनी सांगितला आहे.
जावेद हबीब यांची एक एडव्हाईस घेण्यासाठी सेलिब्रेटी लाखो रुपये खर्च करतात. पण जावेद हबीब मात्र असे अनेक उपाय आहेत जे अगदी फ्री मध्ये शेअर करतात जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यापैकीच एक असा हा उपाय तुमच्या एकमेकांत अडकणाऱ्या आणि गुंता होणाऱ्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरेल. (Jawed Habib Hair Care Home Remedies)
केसांचा गुंता एका झटक्यात जर सोडवायचा असेल तर जावेद हबीब सांगतात की तुम्ही केसांवर ग्लिसरीन लावले पाहिजे. हो मंडळी, तेच ग्लिसरीन हे तोंडाचा अल्सर दूर करण्यात मदत करते. हे ग्लिसरीन जर तुम्ही ऐलोवेरा जेल सोबत मिक्स करून लावले तर तुम्हाला इंस्टंट परिणाम दिसेल. तुम्हाला हे मिक्स्चर मेहंदीच्या ब्रशने आपल्या केसांच्या खालील भागांत लावायचे आहे. झाले, मग तुमचे केस सहज मोकळे होतील आणि तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही.
आपली केसांच्या लांबीनुसार एका भांड्यात एलोवेरा जेल काढून घ्या. जेवढी ऐलोवेरा जेल तुम्ही घेतली आहे त्याचा एक भाग ग्लिसरीन मध्ये मिक्स करा. सामान्यत: 3 ते 4 चमचे ग्लिसरीन लांब केसांसाठी पुरेसे असते. आता या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की जावेद योग्य मिक्सिंग करण्याचा आग्रह करत आहेत. जेव्हा हे मिश्रण तयार होईल तेव्हा तुम्ही आपल्या केसांचे लहान लहान भाग घेऊन कंगव्याच्या मदतीने त्यांना मोकळे करा आणि मग त्यावर ग्लिसरीन मिक्स लावा. मग पुढील 20 ते 30 मिनिटे डोक्यावर शॉवर कॅप लावा. शॉवरकॅप नसेल तर तुम्ही प्लास्टिक पिशवी सुद्धा केसांवर लावू शकता.

Leave a Reply